गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांना दंड, वाढत्या अपघातानंतर बेस्ट प्रशासनाला जाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best mumbai own buses count decreases private wet lease buses rise

बेस्टच्या ताफ्यातील कंत्राटी बसच्या वाढत्या अपघातानंतर बेस्ट प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर आले आहे. बस चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या कंत्राटी बसचालकांवर बेस्ट प्रशासनाने 18 दिवसांच्या तपासणीत 23 कंत्राटी बसचालकांना पकडून प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. साध्या वेशातील बेस्टचे अधिकारी प्रवासी बनून बसमधून प्रवास करीत कारवाईचा बडगा उगारत आहेत.

27 डेपोंमध्ये धडक तपासणी मोहीम

कुलाब्यापासून पश्चिम उपनगरात गोराईपर्यंत, तर पूर्व उपनगरात मुलुंडपर्यंतच्या सर्व 27 बस आगारांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. बेदरकार ड्रायव्हिंग करणे, नशापान करणे अशाप्रकारांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे.