
आपला दिवसातील बहुतांशी वेळ हा आॅफिसमध्ये जातो. परंतु आॅफिसमध्ये योग्य पद्धतीने न बसल्यामुळे, आपल्या पाठीला त्रास होण्यास सुरुवात होते. म्हणूनच आॅफिसमध्ये योग्य बसण्याची पद्धत जाणून घेणे ही खूप गरजेची आहे. खासकरून जे बसल्या जागी काम करतात, त्यांच्यासाठी नीट बसण्याची योग्य पद्धत माहीत असणे हे गरजेचे आहे.
रोज कम्प्युटरवर बसल्यावर कालांतराने आपल्याला मानेची आणि पाठीची समस्या निर्माण होते. परंतु या समस्या टाळण्यासाठी, आपण योग्य पद्धतीने बसल्यास मात करता येते.
डेस्क जाॅब करणाऱ्यांसाठी कायम पाठीचा कणा ताठ ठेवून बसण्याची सवय हवी. जेणेकरून आपल्याला पाठीच्या समस्या उद्भवणार नाहीत.
कम्प्युटर हा कायम आपल्या डोळ्यांच्या रेषेला समांतर असायला हवा. म्हणजे आपल्या डोळ्यांनाही त्रास होणार नाही.
खुर्चीवर बसताना आपले पाय जमिनीवर टेकायला हवेत. जमिनीवर आपले टेकलेले पाय हे ९० अंशाच्या कोनात असणे हे गरजेचे आहे.
Skin Care Tips – सकाळी तुळशीचे पाणी पिणे हे त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही, वाचा सविस्तर
आपल्या हाताची आणि कीबोर्डची पोझिशन देखील फार महत्त्वाची आहे. कीबोर्ड आणि माऊसचा वापर करताना हाताची योग्य हालचाल ही खूप गरजेची आहे.
सलग ७ ते ८ तास काम करणे हे धोक्याचे असते. त्यामुळे आपण कायम ३० ते ४० मिनिटांनी किमान पाच मिनिटांचा ब्रेक घेणे हे गरजेचे आहे. या ब्रेकमध्ये आपण चालण्याचा आणि स्ट्रेचिंगचा व्यायाम करु शकतो. यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगले होते.
कोरियन मुलींसारखे सुंदर केस हवे असतील तर, ‘हा’ हेअर पॅक नक्की करुन बघा
कम्प्युटरवर काम करुन आपले डोळे थकतात. अशावेळी २०-२०-२० हा रुल फाॅलो करायला हवा. म्हणजेच २० मिनिटात २० सेकंदासाठी २० फूटांचे अंतर कम्प्युटर आणि आपल्यात ठेवायला हवे. यामुळे आपल्या डोळ्यांना आरामे मिळतो. सतत स्क्रिनकडे बघितल्याने आपल्या डोळ्यांना त्रास होतो. त्यातून पाणी येते आणि डोकेदुखी सुद्धा होण्याची शक्यता असते.