बेटोलरकडून लो-कार्बन जिओप्राइमसोल्‍यूशनसाठी पहिला व्‍यावसायिक करार, आशियामधील विस्‍तारीकरण कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेटोलरने आज देशात पहिल्‍या व्‍यावसायिक करारांवर स्‍वाक्ष-या केल्‍या. कंपनी आणि तीन हिंदुस्थानी काँक्रीट उत्‍पादक कंपन्‍यांमध्‍ये लो-कार्बन जिओप्राइम सोल्‍यूशनचा वापर करण्‍यासाठी व्‍यावसायिक करार झाले आहेत. हे सोल्‍यूशन सिमेंट पर्यायासाठी इंडस्‍ट्रीयल साइड स्ट्रिम्‍सचा वापर करते.

करार भागीदार स्‍नेह प्रीकास्‍ट, शिव टाइल्‍स आणि बालाजी सिमेंट प्रॉडक्‍ट्स हे आहेत. कंपन्‍यांची उत्‍पादन ऑफरिंग पाइप्‍स व फरशीचे साहित्‍य अशा पायाभूत सुविधा व पर्यावरणीय बांधकामासाठी विविध काँक्रीट उत्‍पादनांवर लक्ष केंद्रित करते. तिन्‍ही कंपन्‍यांनी केलेल्‍या व्‍यावसायिक करारांचा २०२३च्‍या अखेरपर्यंत एकूण २५०,००० टन काँक्रीट उत्‍पादनाचे उद्दिष्‍ट आहे.

‘गेल्‍या आठवड्यात आम्‍ही व्हिएतनामध्‍ये व्‍यावसायिक करारासह आशियाई बाजारपेठ सुरू केली. आम्‍ही आता आशियामधील प्रमुख बांधकाम बाजारपेठ हिंदुस्थानात आमच्‍या जिओप्राइम सोल्‍यूशनचे व्‍यावसायिकरण सुरू ठेवत आहोत,’ असे बेटोलरचे एशिया ऑपरेशन्‍सचे प्रमुख जुहा पिनोमा म्‍हणाले.

करार भागीदारांना काँक्रीट उत्‍पादनांच्‍या निर्मितीमध्‍ये बेटोलरने विकसित केलेल्‍या सोल्‍यूशन्‍सच्‍या जिओप्राइम उत्‍पादन समूहाचा वापर करण्‍याचा अधिकार आहे, ज्‍यामध्‍ये सातत्‍यपूर्ण उत्‍पादन विकास व तज्ज्ञ सेवांसोबत भविष्‍यातील डेटा सपोर्टचा समावेश आहे. कंत्राटदारांना संकल्‍पनेनुसार उत्‍पादित केलेल्‍या त्‍यांच्‍या उत्‍पादनांमध्‍ये जिओप्राइम ट्रेडमार्क वापरण्‍याचा देखील अधिकार आहे.

या तीन कंपन्‍यांपैकी सर्वात मोठी कंपनी स्‍नेह प्रीकास्‍ट आहे, जी मागणी असलेल्‍या, रंगीत पेव्हिंग टाइल्‍सच्‍या उत्‍पादनामध्‍ये विशेषीकृत आहे.

‘आमच्‍या कंपनी तत्त्वांमध्‍ये आम्‍ही आमच्‍या उद्योगक्षेत्रामध्‍ये शाश्‍वत विकासाला चालना देणा-या विकास व तंत्रज्ञानांचा अवलंब करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी असण्‍यास कटिबद्ध आहोत. बेटोलरच्‍या कंपनी डीएनएची आम्‍ही करत असलेल्‍या सातत्‍यपूर्ण विकासाप्रमाणेच कटिबद्धता आहे. जिओप्राइम सोल्‍यूशनची खासियत म्‍हणजे उत्‍पादन प्रक्रियेला पुन्‍हा डिझाइन करावे लागत नाही, पण विद्यमान प्रक्रिया समायोजित करत लो-कार्बन सोल्‍यूशनची अंमलबजावणी करता येऊ शकते,’ असे स्‍नेह प्रीकास्‍टचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रविण चौधरी म्‍हणाले.