भगवान गडावरून रायफल चोरीला, CCTV फुटेज तपास सुरू

585
bhagwan gad

पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर असलेल्या व भगवान बाबांच्या वापरातील वस्तूंच्या संग्रहातील रायफल चोरीला गेल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत.

सदरची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या संदर्भात पाथर्डी पोलीस स्टेशनला प्राथमिक माहिती देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक राठोड हे भगवान गडावर गेले असून सध्या तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे ही रायफल भगवान बाबा वापरत होते, असे सांगण्यात येते. चोरीचा प्रकार आज उजेडात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज मधून सदरची रायफल कोणी चोरून नेली याबाबतची माहिती घेत आहेत. या घटनेमुळे भगवान गडावरील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या