भागवताचार्य नागाचार्य पुराणिक यांचे निधन

680

नांदेडचे ख्यातकीर्त भागवतकार, श्री नागाचार्य पुराणिक यांचे काल रात्री वृद्धपकाळाने निधन झाले. ते 91 वर्षाचे होते. होळी भागातील नृसिंह मंदिराचे पुराणिक म्हणून त्यांनी भागवत पठन सेवा आयुष्यभर केली.

नृसिंह लीलामृत, शनि उपासना स्तोत्र या दोन ग्रंथांव्यतिरिक्त, श्रीमद भागवत कथामृत, हा पंचेचाळीस हजार ओव्यांमधून त्यांनी भागवताचा मराठी अनुवाद केला आहे. श्रीमद् भागवताचे 108, तर रामायणाचे 45 पारायण केले होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू व संस्कृत भाषांवर त्यांचं प्रभूत्व होतं. जिल्हा परिषद शिक्षण खात्यात दीर्घकाळ नोकरी करून ते 1986 साली सेवानिवृत्त झाले होते. काल रात्री 1वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात, त्यांची चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडं, पणतू, कनिष्ठ बंधू श्री व्यंकटेशाचार्य आणि त्यांच्या कुटुंबासह मोठा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या