प्रख्यात भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

प्रख्यात भजन गायक नरेंद्र चंचल यांचे शुक्रवारी दीर्घ आजारामुळे नवी दिल्ली येथे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. नरेंद्र चंचल गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. ‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ या आणि ‘अवतार’ सिनेमातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ अशा अनेक गीतांमुळे ते  घराघरात पोचले होते. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

गायक चंचल यांच्या निधनावर ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘गुणी गायक आणि माताराणीचे भक्त असलेले नरेंद्र चंचल चांगले माणूस होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो’ अशी पोस्ट लता मंगेशकर यांनी लिहिली.

आपली प्रतिक्रिया द्या