
कोकण मराठी साहित्य परिषदेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात पार पडली. या सभेत कोमसापची नवीन कार्यकारिणी आणि नियामक मंडळाची घोषणा करण्यात आली. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.भालचंद्र मुणगेकर,केंद्रीय अध्यक्षपदी नमिता कीर आणि कार्याध्यक्षपदी प्रा.अशोक ठाकूर यांची निवड करण्यात आल्याची माहिती कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी दिली.
जाहिर करण्यात आलेली कोमसापची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, यांच्यासह कोमसापचे सल्लागार – अरूण नेरूरकर, विश्वस्त मंडळ अध्यक्ष – रमेश कीर, विश्वस्त- रेखा नार्वेकर, प्रकाश दळवी, नियामक मंडळ अध्यक्ष -डॉ.भालचंद्र मुणगेकर, नियामक मंडळ सदस्य- उदय सामंत, संजय केळकर, ज्योती ठाकरे, शोभाताई सावंत, प्रा.अशोक ठाकूर, उषा परब, अध्यक्ष- नमिता कीर, परिषदेचे कार्याध्यक्ष-प्रा.प्रदीप ढवळ, परिषदेचे कार्यवाह – प्रा.माधव अंकलगे, सन्माननीय जिल्हाध्यक्ष – मंगेश म्हस्के, डॉ.शशांक पाटील, सुधीर सेठ, मोहन भोईर, प्रवीण दवणे, लता गुठे, प्रशांत डिंगणकर,वाड्:मयीन उपक्रम समिती प्रमुख:- अशोक ठाकूर, कवी केशवसुत स्मारक समिती अध्यक्ष – गजानन पाटील, ग्रंथप्रकाशन समिती- अनुराधा नेरूरकर, महिला साहित्य समिती- गौरी कुलकर्णी/ उषा परब, युवा संघटन व युवा साहित्य संमेलन समिती- दीपा ठाणेकर, जनसंपर्क समिती- एल.बी.पाटील, प्रसार माध्यम – जयू भाटकर, नाट्यसमिती- मोहन भोईर, मराठीच्या भल्यासाठी- रमेश कीर/रेखा नार्वेकर, विधी कायदा समिती- अॅड. यशवंत कदम, केंद्रीय साहित्य संमेलन समिती-रमेश कीर/प्रा.डॉ.प्रदीप ढवळ/नमिता कीर, लेखा परीक्षण समिती- मधुकर टिळेकर(निमंत्रित सदस्य)
समिती समन्वयक म्हणून रवींद्र आवटी यांची निवड करण्यात आली. यावेळी मधूमंगेश कर्णिक म्हणाले की, कोमसापमध्ये नवीन साहित्यिक येणे अपेक्षित होते. त्यामुळे आम्ही या नवीन साहित्यिकांना संधी दिली आहे. कोरोना काळात शाखांनी ऑनलाइन कार्यक्रम घेतले होते. आता आम्ही संमेलनाचे नियोजन करत असून केंद्रीय संमेलन रत्नागिरीत होईल असे त्यांनी सांगितले.
साहित्यामुळे मी घडलो – डॉ.भालचंद्र मुणगेकर
कोमसापच्या नियामक मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ.भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, मी साहित्यामुळे घडलो. माझं आणि कोमसापचे एक नाते आहे. कोमसापच्या तीन संमेलनाचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले आहे. कोमसापच्या दोन गोष्टी मला खूप चांगल्या वाटतात ते म्हणजे कोमसाप सातत्याने महिलांचे साहित्य संमेलन आणि युवकांचे साहित्य संमेलन आयोजित करतात.
उदय सामंत नियामक मंडळात सदस्य
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची कोमसापच्या नियामक मंडळात सदस्यपदी नियुक्ती झाली असल्याचे केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी ज़ाहिर करताना नियामक मंडळाच्या सदस्यांची नावे ज़ाहिर केली.
महेश केळुस्कर हा विषय आमच्यासाठी संपला आहे
कोमसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेश कीर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, कोमसापमध्ये कोणताही गैरव्यव्हार नाही आणि कोणतीही तक्रार आलेली नाही. तसेच महेश केळुस्कर हा विषय आमच्यासाठी संपला आहे. मी महेश केळुस्करांवर आरोप केले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
“>





























































