कोरोनाच्या संकटात गरजू मजुरांना शिवसेनेचा पाठबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अशात सगळे कारखाने, गोडाऊन आणि रोजगार बंद झाले आहेत. अनेक लोकांचं हातावर पोट होते. मात्र या सगळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या हात मजुरांची परिस्थिती जेव्हा समजली तेव्हा त्यांच्या मदतीसाठी शिवसेना प्रणित युवासेना पुढे सरसावली रविवारी शहरातील अश्या अनेक हातमजू, गरजू व गरीब लोकांसाठी जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली.

आपणही मदतीला पुढे या… अश्या अनेक हातमजुर गरिबांच्या मदतीसाठी आर्थिक मदत, अन्यधान्य अथवा खाद्यतेल देत मदत केल्यास अनेकांची भूक भागवू शकतो. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन बेरोजगार समितीच्या युवकांकडून करण्यात आले आहे. यावेळी युवासेना शहर प्रमुख प्रवीण गुप्ता, युवक बेरोजगार कृती समितीचे संयोजक तथा शिवसेना विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, समितीचे सदस्य रवींद्र महाकाळकर, सागर भुरे, कृनाल भाजीपाले, जयेश बोन्द्रे, वीरेंद्र महाकाळकर सह समितीचे युवक सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते.