
गोरेगाव पूर्व येथील भंडारी बँकेची तब्बल आठ कोटींची मालमत्ता सहकार खात्याने सरकारी साइटवरून ई-लिलाव प्रक्रिया न राबवता खासगी साइटवरून राबवली. दलालांनी ही मालमत्ता संगनमत करून राजकीय नेत्यांना विकली, असा आरोप भंडारी बँकेच्या सभासदांनी केला आहे. या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी आझाद मैदान येथे भंडारी बँकेचे सभासद, हितचिंतक शुक्रवार, 24 डिसेंबरला एकदिवसीय साखळी आंदोलन करणार आहेत. सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.


























































