
>>भरत जोशी, वन्यजीव अभ्यासक
सध्या निपाह विषाणूमुळे वटवाघूळ चर्चेत आले आहे. त्याने खाल्लेल्या फळातून हा विषाणू पसरतो. याची लागण होते. खरोखर कशी असते वटवाघळाची जीवनशैली… माणसापासून खूप लांब राहणारा हा निरूपद्रवी प्राणी खरोखर कोणती फळं खातो… जाणून घेऊया सविस्तर…
जगभरात आढळणारे वटवाघूळ हा निरुपद्रवी झाडांच्या फाद्यांवर उलटा लटकत बसणारा असा सस्तन प्राणी. ही वटवाघळं दिवसा उजेडी आपल्याला कधीच दिसत नाहीत. दिवसा तो निद्रावस्थेत असतात. वटवाघळे दिवसा आपल्याला गुहेत आढळून येतात. वटवाघूळ पक्षी नसून मॅमल आहे. त्यांचा अभ्यासच करायचा असेल तर ती वटवाघळे दिवसा पहायची असतील तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफामध्ये आपल्याला ती पाहायला मिळतील.
वटवाघूळ पक्षी की सस्तन प्राणी?
प्रामुख्याने वटवाघळे हे दोन मुख्य प्रकारांत मोडतात ते म्हणजे मेघा बॅटस् आणि मायक्रो बॅटस्. वटवाघूळ पक्षी की (सस्तन प्राणी) मॅमल? असा संभ्रम जनसामान्यांच्या विचारधारेत नेहमीच येत असतो. वटवाघूळ पक्षी नसून (मॅमल) म्हणजेच सस्तन प्राणी आहे. तो पक्षासारखा उडतो, स्वैर संचार करतो. वटवाघळांची मादी प्रजनन काळात अंडी घालत नसून वाघूळ मादी पिलांना जन्म देते. म्हणूनच वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे.
वटवाघळांचे भक्ष्य
वटवाघळांचे मुख्य भक्ष्य म्हणजे छोटे-मोठे कीटक, जंगलातील विंâवा शहरी भागात आढळणाऱ्या वड, पिंपळ, औदुंबर आणि लहानमोठ्या झाडांवरील फळे, त्याचप्रमाणे वटवाघळांचे भक्ष्य असते पुâलामधील मध, केळपूâल वटवाघूळ चोखून घेतात.
वटवाघळांवर आलंय उलटे संकटच
अशा या निरुपद्रवी वटवाघळांवर आता उलटे संकट आले आहे. निपा हा जीवघेणा आजार… हा म्हणे वटवाघळांमुळेच होतो. यापूर्वी काय तर स्वाईन फ्लू त्यानंतर काय तर बर्ड फ्लू. त्यावेळेस हजारोंच्या संख्येत कोंबड्यांची कत्तल झाली. आता काय तर वटवाघळांमुळे निर्माण होणारा ‘निपाह.’ या ‘निपाह’मुळे ताप येतो आणि हा जीवघेणा रोग आहे आणि त्यामुळे मृत्यू ओढवतो.
परदेशातील वटवाघळांची प्रजनन केंद्रे
विविध प्रगत देशांमध्ये वटवाघळांची प्रजनन केंद्रे असून वटवाघळांवर शास्त्रीय अभ्यास करण्याच्या दृष्टीने आणि वटवाघळांवर संशोधनपर शास्त्रीय अभ्यास बरेच शास्त्रज्ञ करीत आहेत. एवढेच नाही तर काही प्रगत देशांत पर्यटकांसाठी रात्री ‘बॅटस् शोज’ आयोजित केले जातात. या बॅटस् शोमध्ये १०-१० च्या बॅचने पर्यटकांना रात्रीच्या गर्दअंधारात जंगलात नेले जाते. प्रत्येक पर्यटकाच्या हातात संरक्षित फ्रेम दिली जाते. वटवाघळांच्या विश्वात जाताना वटवाघळाची धडक बसू नये म्हणून या तीन फूट लांबी आणि दोन फूट रुंदीच्या फ्रेम हातात धरून वटवाघळांचा स्वैर संचार पाहण्यासाठी, त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारचे ‘बॅटस् शोज’ आयोजित केले जातात.
चुकीच्या प्रचाराला आळा घाला
चुकीच्या प्रचारामुळे आणि त्याच्याविषयी होणाऱ्या प्रसारामुळे वटवाघळांची नाहक हत्या होईल. परदेशातून अशी स्वाईन फ्लू, बर्ड फ्लूवरील इंजेक्शने मागविली गेली तशी लाखो रुपयांची इंजेक्शने, औषधे मागवली जातील. हे आपण टाळले पाहिजे. कारण मूळ मुद्दा हा आहे, अपप्रचार हा आहे की वटवाघळांनी खाल्लेली फळे लोकांनी खाऊन त्यापासून ‘निपा’ आजार जडतो. जमिनीवर पडलेली, खाल्लेली, उष्टावलेली फळे लोक खातात का? तर मुळीच नाही. या ‘निपा’विषयीची सत्याची बाजू जाणून घ्या. वटवाघळांसारख्या निरुपद्रवी सस्तन प्राण्याला वाचवा. वटवाघळांची हत्या टाळा. वटवाघळे ही निसर्गाची ठेव आहे.
मुख्य मुद्दा…
मुंबई, ठाणे, बोरिवली परिसरांत झाडांवर जी वटवाघळे आढळून येतात त्यांची ठिकाणे कुठली तर वडाळा-दादर येथील फाइव्ह गार्डन, भायखळ्यातील राणीची बाग, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि कान्हेरी केव्हज येथील गुंफा. वाघळांनी झाडांवरील खाल्लेली फळे खाली पडल्यावर लोक खातात आणि त्यामुळे ‘निपा’ या रोगाचा प्रसार होतो. याचे आश्चर्य नाही का? वटवृक्ष, उंबर, पिंपळ या मोठमोठ्या वृक्षांवरील फळे खाऊन ती टाकलेली फळे आपण खातो तरी काय?
वटवाघळे वाचवा
अशा प्रकारच्या विविध गैरसमजुतींतून वटवाघळांसारख्या निरुपद्रवी सस्तन प्राण्यांवर गदा आलीय. वटवाघळांचे जीवन धोक्यात आलंय. वटवाघूळ हा बिचारा गरीब मॅमल म्हणजेच सस्तन प्राणी आहे. ही बिचारी निरुपद्रवी वटवाघळे दिवसा फार क्वचितच अंधाऱ्या गुहेत दिसतात. वटवाघळांचा संचार नेहमी अंधारातच असतो.




























































