राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे निधन

4191

राष्ट्रीय कीर्तनकार हभप भरतबुवा रामदासी यांचे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास दुःखद निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 65 वर्षांचे होते. बीड जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रभावी कीर्तनकार म्हणूनभरत बुवा रामदासी यांची ओळख होती.

शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या राहत्या घरातच चक्कर येऊन कोसळले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. गाढे अभ्यासक, राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती होती. बीडमध्ये कीर्तन महोत्सव सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

आपली प्रतिक्रिया द्या