
मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे भार्गवी चिरमुले. भार्गवीने नुकतेच तीच्या सोशल मीडियावर नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत देखण्या आणि राजेशाही मराठमोळ्या पारंपरिक रूपात दिसत आहे. यामध्ये भार्गवीने सोनेरी काठांची साडी आणि त्यावर बारीक जरीचे काम असलेला हिरव्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. कपाळावर सुंदर चंद्रकोर रेखाटलेली असून नाकात मोत्यांची आणि खड्यांची पारंपरिक नथ या साडीवर शोभून दिसत आहे. गळ्यात ठुशी, मोत्यांचा चोकर आणि रत्नांनी मढवलेला भारी हार, तसेच कानात वेल असा परिपूर्ण मराठमोळा शृंगार केला आहे. याशिवाय, भार्गवीचा हा संपूर्ण लूक अत्यंत प्रभावशाली आणि समृद्ध मराठी संस्कृतीच्या पारंपरिक सौंदर्याचे दर्शन घडवतो आहे.





























































