भगव्या लाटेची श्रीमंती 15 वर्षानंतर अनुभवतोय! भास्कर जाधव यांचे भावुक उद्गार

3496

‘मी खरा शिवसैनिक आहे. या भगव्या लाटेची श्रीमंती मी 15 वर्षानंतर अनुभवतोय. तुम्ही मला हजारो मतांनी विजयी कराल याचा मला आत्मविश्वास मला आहेच, पण मी माझ्या विरोधकांना सांगतो की मी पूर्वीचा भास्कर जाधव आहे हे विसरू नका’, असा इशारा गुहागर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी दिला. पालवण येथे महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

भगवे झेंडे, भगव्या टोप्या अशा भगव्या वातावरणात सावर्डे पासून पालवण पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. गुहागर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या भाषणांनी जाहिर सभेची मैदाने गाजत आहेत. पालवणवासियांनाही त्यांच्या तडफदार भाषणाची मेजवानी मिळाली. महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव म्हणाले की, 13 सप्टेंबरला मी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर 15 सप्टेंबरला तुम्ही चिपळूणात माझं स्वागत केलेत. आज 15 वर्षानंतर मी या भगव्या लाटेची श्रीमंती अनुभवतोय असे भावुक उद्गार त्यांनी काढले.

आपली प्रतिक्रिया द्या