भाईंदरमध्ये झोपड्यांना भीषण आग; तिघांचा मृत्यू, 24 सिलिंडरचा स्फोट झाल्याने भडका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक पोलीस चौकी परिसरातील झोपड्यांना आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आगीत एकापाठोपाठ 24 सिलिंडरचे स्फोट होऊन भडका उडाला आणि या आगीत आसपासच्या परिसरातील अनेक झोपडय़ा जळून खाक झाल्या आहेत. आगीची तीव्रता पाहून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षेच्या दृष्टीने परिसर पूर्ण रिकामा केला आहे. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

कामाठीपुरा येथील आगीत एकाचा मृत्यू

मुंबईत कामाठीपुरा येथील शंकर मंदिराजवळ, एका घरात लागलेल्या भीषण आगीत एका 32 वर्षीय तरुणीचा होरपळून मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.