
भीमा-कोरेगाव हिंसाचार व एल्गार परिषदप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी रमेश गायचोरने तात्पुरता जामीन मिळावा यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.
वडिलांची प्रकृती बिघडली असून त्यांना भेटण्यासाठी जामीन देण्याची विनंती गायचोरने केली. हायकोर्टाने याचिकेची दखल घेत राष्ट्रीय तपास यंत्रणेला यावर उत्तर देण्याचे आदेश देत सुनावणी दोन आठवडय़ांपर्यंत तहकूब केली. गायचोर न्यायालयीन कोठडीत असून वडिलांच्या प्रकृतीचे कारण देत त्याने तात्पुरता जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता, मात्र विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने त्याने सत्र न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिले.