Video-डिंभे धरणाचा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । आंबेगाव

पुण्यातल्या डिंभे धरणाचा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे तर्फे घोडा परिसरातील कानसे गावाजवळ हा कालवा फूटून शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातून आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांना पाणीपुरवठा होतो. बुधवारी सकाळी काणसे गावाच्या हद्दीत कालवा फुटल्याने आधीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या या भागाला मोठा फटका बसण्याची श्यक्यता व्यक्त होत आहे.