भोकरदन मध्ये वैद्यकीय सेवा कोलमडली, कोरोनाच्या धास्तीने अनेक खाजगी दवाखाने बंद

318
प्रातिनिधिक फोटो

21 मार्च पासून राज्यात लॉक डाऊन करण्यात आला असून भोकरदन शहरात प्रशासनाकडून करण्यात आलेल्या जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाचे पालन करण्यात येत असले तरी मात्र शहरातील अनेक तरुण याचे उल्लंघन करत आहेत. तसेच कोरोनाच्या धास्तीने शहरातील अनेक खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केल्याचे दिसून येत आहे तर ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा अडथळा निर्माण होत असून शासकीय रुग्णालय निर्जन झाले तर खाजगी दवाखाने देखील बंद असल्यामुळे वैद्यकीय सेवा कोलमडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

दरम्यान प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू म्हणून किराणा दुकाने भाजीपाल्याची दुकाने मेडिकल पेट्रोल डिझेल आदी सुविधा नागरिकांसाठी सुरू ठेवल्या असून एकीकडे याचाच फायदा घेत नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत असून गर्दी करत असल्याचेही पहावयास मिळत आहे. “गर्दीला आळा कोरोना टाळा” या उक्तीप्रमाणे नागरिक वागल्यास या विषाणूजन्य कोरोना व्हायरसला चाप लागेल. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना मात्र धडा शिकवणे योग्य ठरेल. काही तरुणांनी तर काही काम नाही म्हणून मोटारसायकलवरून बहादुरी दाखवत या रस्त्यावरून त्या रस्त्यावर आणि त्या गल्लीतून या गल्लीत मोकाटपणे फिरण्याचे प्रकार वाढत आहेत याला मात्र चोप देणे गरजेचे आहे. विशेषतः येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात चेकअप साठी येणाऱ्या नागरिक व रुग्णांना केवळ नाव नोंदणी करून माघारी पाठवून देण्यात येत असून त्यांच्याकडे तपासणी केल्याचा एकही कुठलाच पुरावा नसल्यामुळे अनेकांना अडचणी होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या