
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणारा, अनेकांना कोट्यावधींना गंडविणाऱया अशोक खरातचा ‘भोंदूगिरी’चा अड्डा असलेल्या कार्यालयाला तपासी पथकाने आज सील ठोकले आहे.
नाशिकच्या पॅनडा कॉर्नर भागात अशोक खरात याने ओकस प्रॉपर्टीच्या आडून भविष्य सांगण्याचा भोंदूगिरीचा अड्डा सुरू केला होता. महिला अत्याचाराचे आठ गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. दोघांची कोटय़वधी रुपयांची लूट केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हाही दाखल आहे. भोंदूगिरीच्या अड्डय़ावरून पोलिसांनी महिलांच्या शोषणाचे अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ हस्तगत केले आहेत. विशेष तपासी पथकाने गुरुवारी पुन्हा या कार्यालयाची झडती घेतली, प्रिंटरसह आक्षेपार्ह कागदपत्रे, सामग्री जप्त केली आणि या कार्यालयाला सील ठोकले.





























































