प्रशिक्षण घ्या, ‘आदर्श सून’ व्हा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, वाराणसी

वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठाच्या आयआयटी विभागाकडून मुलींना आदर्श सून बनण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून तीन महिन्यांचा हा कोर्स असेल. यंग स्किल्ड इंडियाचे सीईओ नीरज श्रीवास्तव यांच्या मते समाजात वाढणाऱ्या समस्या पाहता या कोर्सची सुरुवात करण्यात येत आहे.हा कोर्स खासगी संस्था आणि ‘डॉटर्स प्राईड-बेटी मेरा’ अभियानाअंतर्गत तयार करण्यात आला असून आत्मविश्वास, कौशल्य, समस्या सोडवण्याचे कौशल्य, तणावाच्या प्रसंगी दाखवले जाणारे गुण यासोबतच कॉम्प्युटरची माहिती, फॅशनबद्दलचे ज्ञान, लग्नाचे कौशल्य आणि सामाजिक गुण या तीन महिन्यांच्या प्रशिक्षणात शिकवले जाणार आहेत. लवकरच यासाठी विभागाकडून विद्यार्थिनींची निवड करून तयारी सुरू केली जाणार आहे, असे नीरज श्रीवास्तव यांनी सांगितले. वनिता इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझाईनमध्ये या कोर्सची सुरुवात केली जात आहे.