थरारक ! बदला घ्यायला येतेय दुर्गामती, पाहा भुमीच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर

अभिनेत्री भुमी पेडणेकर हिची जबरदस्त भुमिका असलेला चित्रपट दुर्गामती चा आज ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलरच थरारक असून त्यातील भुमीचे रुप पाहून धक्काच बसेल. हा चित्रपट तेलुगु चित्रपट भागमतीचा हिंदी रिमेक आहे.

या चित्रपटात भूमी ही चंचल चौहान नाव असलेल्या कैद्याच्या भुमिकेत दिसत आहे. तर अभिनेत्री माही गिल ही पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत असून अर्शद वारसीची देखील मुख्य भुमिका आहे. एका मर्डरच्या आरोपात तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या चंचलच्या चौकशीसाठी पोलीस तिला एका पडक्या वाड्यात घेऊन जातात. त्या वाड्यात चौकशीदरम्यान अनेक प्रकार घडतात. हा चित्रपट अत्यंत गूढ व थरारक असल्याचे या ट्रेलर वरून दिसत आहे.

खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्य जिल्ह्यात विविध समाजउपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. लोणार तालुक्यात शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी यांच्या नेतृत्वात देखील विविध कार्यक्रम घेण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या