आमच्याकडे एक गोड सरप्राईज आहे… भूषण केतकीचं मॅटर्निटी फोटोशूट? चर्चांना उधाण

मराठी चित्रपट सृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणजे घरत गणपती फेम अभिनेता भूषण प्रधान हा तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचा लूक, फिटनेस यावर अनेक मुली भाळल्या आहेत. भूषणने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. भूषण नेहमीच सोशल मीडियावरील सक्रिय अभिनेता आहे. तो प्रोफेशल लाईफ व्यतिरिक्त तो आपल्या पर्सनल लाईफबाबत अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. दरम्यान त्याने सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले असून त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

भूषण प्रधानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री केतकी नारायणसोबत काही लक्षवेधी फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघांनीही पारंपारिक लूक केला आहे. पण त्यांनी शेअर केलेल्या पहिल्याच फोटोमुळे चाहते बुचकळ्यात पडले आहेत. या दोघांनीही मॅटर्निटी फोटोशूटसारखी पोझ दिली आहे. त्याचसोबत फोटो शेअर करताना आमच्याकडे एक गोड सरप्राईज आहे… असे कॅप्शनही दिलं आहे. त्याच्या फोटो आणि कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून अभिनेचा भूषण आणि अनुषा यांच्या रिलेशनशीपवर चर्चा सुरु होत्या. अनेक कार्यक्रमांमध्ये ते दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. दरम्यान या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत असताना भूषण एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबत फोटोशूट करताना दिसला. त्यामुळे आता चाहत्यांनी त्याच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भूषण लग्न न करताच बाबा होणार का? मग आता अनुषाच काय होणार? फोटो पाहून नक्की काय समजायचं आम्ही, लग्न करताय की त्याआधीच बाळाची अपेक्षा? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान आता भूषणने शेअर केलेल्या या फोटोमागचं सत्य म्हणजे त्या दोघांचा नवा प्रोजेक्टही असू शकतो. त्यामुळे या फोटोमागचं सत्य नेमक काय आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. फोटो शेअर केल्यानंतर अद्याप भूषणने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.