टीम इंडियाला दिलासा, भुवनेश्वरचा नेटमध्ये गोलंदाजीचा सराव

37
bhuvneshwar-kumar

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा 27 जूनला वेस्ट इंडीजशी सामना होणार आहे. या लढतीपूर्वी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आली आहे. दुखापतग्रस्त झालेले वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार फिट झाला असून मंगळवारी त्याने नेटमध्ये 30 ते 35 मिनिटे गोलंदाजीचा सराव केला. भुवी फिट दिसत असला तरी अद्याप तो ओल्ड ट्रफॉर्डवर इंडीजविरुद्धच्या लढतीत मैदानात उतरेल की नाही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मंगळवारी सरावसत्रामध्ये भुवनेश्वर कुमार सहभागी झाला. भुवनेश्वरने जवळपास 30 ते 35 मिनिटे गोलंदाजी केली. सुरुवातीला त्याने छोटा रनअप घेत गोलंदाजीला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू रनअप वाढवला. भुवीने फिजिओ पॅट्रिक फरहाट यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीचा सराव केला. भुवीचा सराव पाहता दुखापतीतून सारवल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत झाली होती दुखापत
भुवनेश्वरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत दुखापत झाली होती. तिसऱ्याच षटकात भुवीच्या पायाचे स्थायू दुखावले गेले होते. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या