आधी जंगल करावं लागणार पार, त्यानंतर उघडणार ‘बिग बॉस’चं दार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस’ ओटीटी शो संपताच सलमान खान कलर्सवर ‘बिग बॉस’चा 15 वा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘बिग बॉस 15’चा प्रोमो रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री करण्यापूर्वी सदस्यांना आधी जंगल पार करावं लागणार आहे. त्यामुळे शोची यंदाची थीम काहीशी हटके असणार यात शंका नाही.


View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

प्रोमोमध्ये सलमान खान जंगलात बसून ‘बिग बॉस’चे घर शोधताना दिसतोय. सलमान एका झाडाखाली बसलेला असताना अचानक एक आवाज येतो. “सलमान, गेल्या 15 वर्षांपासून तुझी वाट पाहत होते…आता कुठेतरी मनाला शांती मिळाली…’’ यावर सलमान खान म्हणतो, “मी तुमचा खूप आभारी आहे विश्वसुंदरी…पण इथेच कुठेतरी होतं ‘बिग बॉस’चं घर…आता कुठे दिसतंच नाही…’’ त्यानंतर विश्वसुंदरी म्हणते, “यंदा घरातील सदस्यांना आधी जंगल करावं लागणार पार, त्यानंतर खुलणार ‘बिग बॉस’च्या घरचं दार’’ यावर सलमान खान म्हणतो, “तुम्ही सर्व खूप हसणार आहेत…कारण बिग बॉसचे सदस्य खूपच वाईट पद्धतीने फसणार आहेत.’’ या प्रोमोला एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी आवाज दिला आहे.


View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)