
छोटय़ा पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रियालिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. कलर्स मराठी वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व लवकरच भेटीला येणार आहे. महेश मांजरेकर हेच सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत. शोचा टिझर लाँच झाल्यापासून यंदा बिग बॉसच्या घरात कोणते कलाकार एंट्री घेणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. बिग बॉसच्या घरात कोण जाणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.
‘झी मराठी’वरील ‘माझ्या नवऱयाची बायको’ या मालिकेतील शनायाची भूमिका साकारणारी रसिका सुनील, ‘देवमाणूस’मुळे लोकप्रिय झालेली ग्लॅमरस अभिनेत्री नेहा खान, ‘काहे दिया परदेस’फेम ऋषी सक्सेना, छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावर विविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता सुयश टिळक, छोटय़ा पडद्यावरची लाडकी सूनबाई तेजश्री प्रधान, अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेता संग्राम समेळ, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर, स्टार प्रवाहवरील ‘रुंजी’ या मालिकेतील अभिनेत्री पल्लवी पाटील आदी कलाकारांच्या नावाची सध्या चर्चा होत आहे. मात्र बिग बॉसच्या घरात यापैकी कोणते कलाकार सहभागी होणार, या सिव्रेटवरून प्रत्यक्ष शो सुरू झाल्यावरच पडदा हटणार आहे. कारण कोणत्याही कलाकाराला त्याविषयी अधिकृत भाष्य करण्याची परवानगी नसते. बिग बॉसच्या पहिल्या सिजनचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे हिने तर दुसऱया सिजनचे विजेतेपद शिव ठाकरे याने पटकावले होते.




























































