
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. मुंबईमध्ये आज सकाळी मतदान करुन आलेल्यांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
घडलेल्या या प्रकारामुळे यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने खूण करण्यात येत आहे. नखावरील शाई पुसली जात असल्याची कबुली मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
मतदार याद्यांमध्ये मृतकांची, सोडून गेलेल्यांची नावे मतदार यादीत कायम असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. तसेच ऐनवेळी मतदान केंद्र दुसरीकडे आल्याने मतदारांमध्ये रोष दिसून येत आहे. या सावळ्यागोंधळामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असून, त्यांना या बुथवरुन त्या बुथवर जावे लागत आहे.





























































