
आगामी बिहारची विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी (आप) स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती दिल्लीतील आप संयोजक, माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी बुधवारी दिलीय. बिहारमधील सर्व 243 जागांवर ‘आप’ स्वतंत्रपणे उमेदवार उभे करणार आहे, असे ते म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या निवडणुका पार पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.