कोरोना संकटात निवडणूक प्रचार कसा करणार? निवडणूक आयोगाने मागविल्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या संकटात निवडणुका कशा घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचार कसा करणार याबाबतच्या सूचना सर्व राजकीय पक्षांकडून मागविल्या आहेत.

बिहार विधानसभा निकडणुका ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या कालावधीत होण्याची अपेक्षा आहे. आगामी विधानसभा निवडणुका या ‘सुपर स्प्रेडर इव्हेंट’ होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती अनेक विरोधी पक्षांनी केली आहे. याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचाराच्या आराखडय़ासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांकडून 31 जुलैपर्यंत मते व सूचना मागविल्या आहेत.

मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 250 पर्यंत मर्यादित करा
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी. तोंडावर मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या 250 पर्यंत मर्यादित करण्यात यावी, अशी सूचना निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी केली आहे.