बिहारमधील औरंगाबादच्या नामांतराबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी! संजय राऊत यांचे रोखठोक प्रतिपादन

बिहारमधील औरंगाबादचे नामांतर करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. तेथील मुख्यमंत्री नितीशपुमार यांनी मात्र त्या नामांतरास स्पष्ट नकार दिला आहे, त्याबाबत भाजपाने भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले.

नाशिकच्या एक्प्रेस इन हॉटेलमध्ये शुक्रवारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार वसंत गिते, सुनील बागूल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याबाबत भाजपा प्रश्न उपस्थित करीत आहे. संभाजीनगर हे संभाजीनगरच राहणार आहे, हे नाव हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आहे हे भाजपवाल्यांनी विसरू नये, असेही खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. बिहार राज्यात औरंगाबाद नावाचा एक मोठा जिल्हा आहे. त्याचेही हिंदू धर्मानुसार नामांतर व्हावे, अशी मागणी काही महिन्यांपासून होत आहे. या नामांतरास बिहारचे मुख्यमंत्री नितीशपुमार यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्याबाबत बिहारच्या आणि महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान त्यांनी दिले.

विमानतळाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव का नाही?

संभाजीनगरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास ‘धर्मवीर छत्रपती संभाजीराजे’ असे नाव द्यावे, हा प्रस्ताव पॅबिनेट मंत्रिमंडळात एकमुखाने मंजूर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव पेंद्र शासनाकडे पाठवून एक वर्ष झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे लोक संभाजीनगर शहराबाबत आग्रह धरतात; पण अद्यापही तेथीलच आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव का दिले जात नाही, असा प्रश्न आहे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

राज्यपालांना सांगा, घटनेचा खून करू नका!

पॅबिनेटचे निर्णय आणि शिफारशी या घटनेनुसार राज्यपालांवर बंधनकारक असतात. असे असतानाही आठ महिने होऊनही विधान परिषदेच्या बारा जागा तुम्ही रिकाम्या कशा ठेवू शकता? घटनात्मक पदावर बसून तुम्ही घटनेचे मारेकरी म्हणून काम करताय का? असा खडा सवाल खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केला. जोपर्यंत सरकार पाडले जात नाही पिंवा आपल्या मनासारखे सरकार येत नाही तोपर्यंत राज्यपाल नियुक्तीच्या शिफारशींवर सही करायची नाही, अशा सूचना पिंवा आदेश राज्यपालांना कोणी दिले आहेत का, हे राज्यपालांनी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले. बारा सदस्यांच्या नियुक्त्या प्रलंबित राहणे, हा विधिमंडळाचा आणि महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेचा अपमान आहे, हे भाजपाला वाटत असेल, ते महाराष्ट्राचे काही देणेघेणे लागत असतील, घटनेशी भाजपाचा संबंध असेल तर राजकीय मतभेद, राजकीय लढाया आम्ही लढू पण तुम्ही घटनेचा खून करू नका, हे भाजपाने राज्यपालांना सांगायला हवे, असेही खासदार राऊत म्हणाले.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिकमधील भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागूल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याप्रसंगी महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या