
सामना ऑनलाईन । पाटणा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरात हिंसाचार उफाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यादृष्टीने केंद्राने सर्व राज्यांना निर्देश दिले आहे. परंतु याच दरम्यान बिहारमध्ये एक अपक्ष उमेदवार पत्रकार परिषदेमध्ये अत्याधुनिक हत्यार घेऊन पोहोचला. या अपक्ष उमेदवाराचे नाव रामचंद्र सिंह यादव असे असून त्याने लोकशाही वाचवण्यासाठी हत्यार उचलण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच पक्षाच्या बाजूने अपेक्षित निकाल लागले नाही तर रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकी दिली.
ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी गरज पडल्यास हातात शस्त्र घ्या- उपेंद्र कुशवाहा
बिहारमधील भुभाआचा माजी आमदार आणि सध्या बक्सर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उभा राहिलेला रामचंद्र सिंह यादव याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईसाठी सुरक्षा दलाचे अधिकारी आणि पोलीस त्याच्या घरी दाखल झाले. परंतु तत्वपूर्वीच तो फरार झाला होता.
Kaimur: Security Forces conduct raid at residence of Independent Candidate Ramchandra Yadav who had brandished a gun earlier today at a press conference. #Bihar pic.twitter.com/dvdWGmIqm1
— ANI (@ANI) May 22, 2019
पत्रकार परिषदेमध्ये काय झाले?
पत्रकार परिषदेमध्ये रामचंद्र सिंह यादव म्हणाले की, तेजस्वी यादव आणि उपेंद्र कुशवाह यांच्या बोलण्याने होणार नाही, करावेच वागेल, लढावेच लागेल. लढल्याशिवाय कोणता हक्क मिळत नाही. प्रजातंत्र, लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आम्ही मरण्यास, लढण्यास आणि तुरुंगात जाण्यासही तयार आहोत. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी हत्यार उचलण्यास आणि गोळीबार करण्यासही तयार आहोत.

























































