बिहारमध्ये पुरानंतर डेंग्यूचे थैमान, रुग्णांची संख्या 900 पार

बिहारमध्ये पाऊस आणि पूरानंतर डेंग्यूने थैमान घातले आहे. पुरामुळे जागोजागी पाणी साचले असून डासांची पैदास वाढली असून तब्बल 900 हून अधिक नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. एकट्या पाटणामध्येच 640 डेंग्यूचे रुग्ण आहेत.

शनिवारी 120 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले. तर चिकनगुणियाने 70 हून अधिक जणांना लागण झाली आहे. यामुळे नागरिकांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक गावागावात जाऊन रुग्ण तपासणी करत आहेत. पुरामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली असून डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे डासांचा नायनाट करण्यासाठी 24 पथक प्रभावित क्षेत्रांमध्ये टेंफोसची फवारणी करत आहेत.

;

आपली प्रतिक्रिया द्या