
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएने पाशवी बहुमत मिळवले. बिहारमधील 243 पैकी 200 हून अधिक जागा एनडीएने मिळवल्या आणि नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फक्त 5 जागा जिंकता आल्या. यानंतर आता काँग्रेस हायकमांड अॅक्शन मोडवर आली असून बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. काँग्रेसने 7 बड्यांना नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.
बिहार काँग्रेस प्रदेश कमिटीने पक्षविरोधी कारवाई आणि शिस्तभंगाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत 7 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली असून यामुळे पक्षांतर्गत वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीतील पराभवासाठी आम्हाला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा आरोप पक्षातून हकालपट्टी झालेल्या नेत्यांनी केला आहे.
एसआयआर ही सुधारणा नव्हे, लादलेला अत्याचार; राहुल गांधी यांची जोरदार टीका
कोण आहेत ते 7 नेते?
काँग्रेस सेवा दलाचे माजी उपाध्यक्ष आदित्य पासवान, बीपीसीसीचे माजी उपाध्यक्ष शकीलुर रहमान, किसान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राज कुमार शर्मा, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राज कुमार राजन, मागास विभागाचे माजी अध्यक्ष कुंदन गुप्ता, बांका जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षा कांचना कुमारी आणि नालंदा जिल्ह्यातील रवी गोल्डन या 7 जणांवर पक्षाने कारवाई केली आहे.
नितीश कुमार यांनी 20 वर्षांनी सोडले गृह खाते, बिहारमध्ये सत्तेचे खरे नियंत्रण भाजपने ओढले



























































