Bihar Election : एनडीएमध्ये रस्सीखेच; मागणी पूर्ण न झाल्यास एलजीपी स्वबळावर लढणार

बिहार निवडणुकांचा बिगुल वाजला आहे, मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महागठबंधनमध्ये जागांची वाटणी झालेली नाही. सर्वाधिक रस्सीखेच एनडीए मध्ये सुरू आहे. लोक जनशक्ती पक्षाची (एलजेपी) 42 जागांची मागणी आहे. ही मागणी मान्य नाही झालं तर स्वबळावर लढण्याचा इशारा लोक जनशक्ती पक्षाने दिला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एलजेपीला 2015 प्रमाणेच 42 जागांवर निवडणूक लढवायची आहे. त्यांचे म्हणणे आहे की 2014 मध्ये त्यांच्या पक्षाने 7 लोकसभे जागांवर लढल्या होत्या तेव्हा त्यांना लोकसभेच्या जागांनुसार 6 विधानसभेच्या जागा मिळाल्या होत्या. 2019 लोकसभा निवडणुकीत पक्षाने 6 लोकसभेच्या जागा लढवल्या आणि एकच राज्यसभेची जागा मिळाली. हे पाहाता एलजेपीला या निवडणुकीत देखील 42 जागा मिळणे आवश्यक आहेत.

एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी एनडीएला नजरेसमोर ठेवत भाजपसमोर नवा फॉर्म्युला ठेवला आहे. त्यानुसार एलजेपीला 33 विधानसभेच्या जागांसोबत बिहारमध्ये राज्यपालांद्वारे निवडण्यात येणाऱ्या 12 सभासदांपैकी दोन सभासदांच्या जागा मिळाल्या पाहिजेत आणि ऑक्टोबरच्या शेवटी यूपीमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत एक राज्यसभेची जागा त्यांच्या पक्षाला मिळावी.

चिराग पासवान, यांनी भाजपला आणखी एक फॉर्म्युला दिला होता. ज्यानुसार जर त्यांना राज्यसभेची जागा नाही दिली तर बिहार निवडणुकी आधी जागांच्या घोषणेसोबतच एनडीए सरकार आल्यास भाजपसोबत एलजेपीकडून चिराग पासवान देखील उपमुख्यमंत्री म्हणून आधीच घोषित करावे.

आपली प्रतिक्रिया द्या