
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेत्यांवर सडकून टीका केली. खोटं बोलण्यात आपण एनडीएच्या नेत्यांचा हात धरू शकत नाही हीच आपल्यात एक कमतरता आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.
हम सरकार चलाना जानते हैं,
आपके मन की बात जानते हैं,
हाँ, हम झूठ बोलना नहीं जानते,
ना कभी सीखेंगे!बदलाव की राह पर बिहार की जनता के ज़बरदस्त जोश को सलाम! pic.twitter.com/waufPk5S4l
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 28, 2020
राहुल गांधी यांनी बुधवारी पश्चिम चंपारणमध्ये झालेल्या प्रचारसभेत महाआघाडीच्या उमेदवारांना मते देण्याचे आवाहन बिहारच्या नागरिकांना केले. राहुल गांधी यांनी या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केले. एनडीएचे नेते इतके खोटं बोलतात की त्यांच्यासमोर खोटं बोलण्यात आपण त्यांचा हात धरूच शकत नाही असे ते म्हणाले.
मोदी, नितीशना वडे तळून घाला
या सभेच्या वेळी व्यासपीठाच्या समोर बसलेल्या गर्दीतून पुणीतरी ‘पकोडे…पकोडे’ असा आवाज देत पंतप्रधानांच्या ‘रोजगार’ देण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यावर राहुल गांधी यांनी त्या व्यक्तीला उद्देशून ‘तुम्ही वडे बनवलेत का कधी? पुढच्या वेळेस आले तर वडे तळून मोदी आणि नितीश यांना खायला घाला’ असे म्हणाले. त्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
























































