बिहारमध्ये पुराचा कहर, 50 लाखहून अधिक लोक विस्थापित

361

गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये पुराचा कहर सुरूच आहे. पुरामुळे राज्यातील 14 जिल्ह्यांना फटका बसला असून 50 लाख हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. सर्व पुरग्रस्तांसाठी बचाव कार्य सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

94 हजार कुटुंबांना प्रत्येकी 6 हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आतापर्यंत 116 कोटी रुपये मदत देत्ण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबांनाही लवकरच मदत करण्यात येईल अस प्रशासनाने म्हटले आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात 1340 सामुदायिक किचन सुरू करण्यात आले असून 9 लाख लोकांच्या अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहे.

19 जिल्ह्यांमध्ये बचाव छावणी उभारण्यात आल्या आहेत. त्यात 24 हजार नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. पुराचा सर्वाधिक फटका सीतामढी, शिवहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपालगंज, चंपारण सह 14 जिल्ह्यांना बसला आहे. पुरामुळे अनेक रस्ते ठप्प झाले आहेत. छपरा मुझफ्फरपूर, मोतिहारी हे मार्ग बंद करण्या आले आहेत. दरभंगामध्ये बांध तुटल्याने शेकडो घरांमध्ये पाणी घुसले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या