
बिहारमधील मधेपुरा येथील मुरलीगंज येथील धर्मशाळेत भाजपच्या एका कार्यक्रमादरम्यान गोळीबार करण्यात आला. भाजपच्या दोन गटात वाद झाला आणि भाजप नेते पंकज पटेल यांनी हा गोळीबार केला असून त्यात एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. याप्रकरणी पंकज पटेल यांनी गोळीबार केल्याप्रकरणी त्यांना अटक केली आली.
भाजप महाजनसंपर्क अभियानांतर्गत मुरलीगंज येथे रविवारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नगरचे कार्यकर्तेही गेले होते. याच दरम्यान भाजप नेते पंकज पटेल आणि संजय भगत यांच्या गटात मतभेद झाले आणि दोन गटात वाद झाला. वाद मारामारीपर्यंत आला आणि एकमेकांवर खुर्च्याही फेकण्यात आल्या. संतापलेल्या पंकज पटेल यांनी गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी दुसऱ्या गटातील कार्यकर्ता संजय भगत याच्या पायाला लागली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कार्यकर्त्यांला तत्काळ मधेपुरा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद आणि माजी मंत्री नीरजसिंग बबलू हेही या कार्यक्रमाला उपस्थितती लावणार होते मात्र गोळीबार आणि प्राणघातक हल्ल्याची माहिती मिळाल्याने दोघेही अर्ध्या रस्त्यातूनच परतले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले. यावेळी पंकज पटेल यांना अटक करण्यात आली आबे.


























































