
सामना ऑनलाईन। पाटणा
देशभरात मॉब लिंचिंगचे सत्र सुरुच असून जमावाच्या मारहाणीत अनेक निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच एक घटना बिहारमधील दानापूर येथील रुपसपूर मधील खगौल नहर रोड येथे घडली आहे. मुलं चोरणारे टोळके समजून जमावाने तिघाजणांना बेदम मारहाण केली. यातील एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याआधीही बिहारमध्ये मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या आहेत.
एका पन्नास वर्षीय महिलेला चेटकीण समजून बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यात तिचा मृत्यू झाला.अचानक एक जमाव महिलेच्या घरात घुसला होता. तू चेटकीण आहेस असे ओरडत जमावाने महिलेला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाम करण्यास सुरुवात केली त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या मुलाने पोलिसात गावकऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.


























































