
जे लोक दारू पितात, ते हिंदुस्थानी नाहीत. ते खूप नालायक लोक आहे, महापापी आहेत, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. जे लोक राष्ट्रपिता महात्मा गांधींचे शब्द ऐकत नाही, समजून घेत नाहीत, याला काय अर्थ आहे? असा सवाल करीत त्यांनी बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. दारूबंदीच्या निर्णयावरून नितीशकुमार यांचे सरकार बॅकफूटवर पडले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनीही दारू पिण्यास विरोध केला होता. जे त्यांच्या तत्त्वांच्या विरोधात जातात, ते महापापी आहेत. दारू पिणे हानिकारक आहे हे माहीत असूनही लोक दारू पितात. त्यामुळे दारूपासून होणाऱया परिणामांना ते लोक स्वतः जबाबदार आहेत, असे विधान नितीशकुमार यांनी बुधवारी केले.



























































