
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जुलैला बिहारच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा कट रचलेल्या दोघांना पाटणाच्या फुलवारी शरीफ भागातून पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना 11 जुलैला पोलिसांनी अटक केली आहे.
अतहर परवेझ व मोहम्मद जलालुद्दीन अशी त्या दोघांची नावं आहेत. हे दोघे मोदींच्या रॅलीच्या 15 दिवस आधीच फुलवारी शरीफ येथे आले होते. तेथे त्यांना ट्रेनिंगही देण्यात येत होते. मोदींच्या ताफ्यावर हल्ला कसा करायचा यासाठी 6 व 7 जुलैला त्यांची एक बैठक देखील पार पडली. गुप्तचर यंत्रणांकडून याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संशयित दहशतवाद्यांच्या कार्यालयावर धाड टाकून त्यांना अटक केली आहे.
2047 पर्यंत हिंदुस्थानला मुस्लीम राष्ट्र बनवायचे
या धाडीदरम्यान पोलिसांना काही कागदपत्रे आढळळी असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील काही कागदपत्रांवर ‘2047 इंडिया टुवर्ड्स रुल ऑफ इस्लामिक इंडिया’ असे लिहलेले आहे. तसेच या आशयाचे 25 पॅमप्लेट देखील सापडले असून त्यात देखील हिंदुस्थानला मुस्लीम बहुल देश बनविण्याबाबत लिहले आहे.




























































