
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभेची निवडणूक लढविण्यात येईल. भाजप, जेडीयू व लोक जनशक्ती पार्टी एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप प्रदेश कार्य समितीची व्हच्र्युअल बैठकही पार पडली. या बैठकीत एनडीएतील सहकारी पक्ष असलेले जदयू आणि लोक जनशक्ती पार्टीला सोबत घेऊन निवडणुका लढविल्या जातील. आपल्याला केवळ भाजपचीच नव्हे, तर आपल्या मित्रपक्षांच्या मूल्यांचीही काळजी घ्यावी लागेल असे स्पष्ट केले.
कोरोना काळात निवडणूक होत असल्याने हे एक मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांनी छोट्या-छोट्या बैठका आयोजित करून प्रचार सुरू करावा तसेच घरोघरी जाऊन नितीश कुमार यांनी केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन त्यांनी केले. बिहार व देशात विरोधी पक्ष पूर्णपणे संपुष्टात आला असून विरोधी पक्षाकडून केवळ पोकळ राजकारण केले असल्याचे ते म्हणाले.



























































