पुलावरून मोटारसायकल नदीपात्रात पडली, एकाचा मृत्यू

560
accident

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड शहरातील विंचरणा नदीच्या पुलावर एक विचित्र अपघात झाला आहे. गाडी चालवत असताना मोटारसायकलस्वार पुलावरून थेट खाली खड्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

भागवत प्रभाकर काळे (वय 32), हा मंगळवारी 20 रोजी रात्री मोटारसायकलसह खाली खड्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व माजी सरपंच सुनील कोठारी यांनी धाव घेतली व मृतदेह पोलिसांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयत दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या