उदगीर येथे मोटारसायकल चोरट्यास पकडले, चोरलेल्या 8 मोटारसायकल्स जप्त

1217

उदगीर येथे चोरी केलेल्या मोटारसायकली विक्री करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी एकास पकडले. उदगीर शहरासह शेजारच्या कर्नाटकातून मोटारसायकली चोरल्याची कबुली त्याने दिली असून तब्बल 8 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक कोमवाड, कर्मचारी संजय भोसले, तरडे, खुर्रम काझी, बंटी गायकवाड, रियाज सौदागर, भिष्मानंद साखरे, गोविंद जाधव यांना उदगीर येथे एकजण चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली होती. किशोर कांबळे याला पोलीस पथकाने घरातून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या घरामध्ये चोरीच्या 8 मोटारसायकली आढळून आल्या. सुमारे 2 लाख 85 हजार रुपयांच्या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

मोटारसायकली चोरण्याच्या कामात त्याला बालाजी श्रीमंगले हा मदत करीत होता. मात्र त्याला बीदर येथील पोलीसांनी अटक केलेली होती. चोरीच्या मोटारसायकलीसह किशोर कांबळे यास उदगीर शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या