कोपरगाव- दुचाकीस्वाराची लूट, 29 हजार लुटले

1009

कोपरगाव तालुक्यातील उक्कडगांव शिवारात कोपरगांव वैजापूर रोडवर गुरुवारी एका दुचाकीस्वाराला लुटण्यात आलं आहे. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास एका दुचाकीस्वारास तिघांनी मोटर सायकलवर येऊन आडवे झाले व त्याचेजवळील मोटरसायकलसह मोबाईल, पाच हजार रुपये रोख घेऊन तिघांनी धूम ठोकली. या रस्तालुटीत 29 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. कोपरगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

या संदर्भात माहिती अशी की, लखन नवनाथ आहेर (रा.भोजडे) हे हिरो कंपनीची मोटर सायकल एच एफ डिलक्स क्रमांक एमएच 15 डीएन 9897 घेऊन कोपरगांव वैजापूर रोडने गुरुवारी संध्याकाळी घरी निघाले असता उक्कडगावाच्या जवळ स्मशानभूमी नजिक एक काळ्या रंगाची पल्सर मोटर सायकलवर तीन अज्ञात आरोपी आले. त्यांनी मोटर सायकल आडवी लावली. तिन्ही इसमांचे चेहरे रुमालाने बांधलेले होते. त्यांच्यापैकी एकाने मोटर सायकलची चावी काढून घेतली. लखन आहेर यांना बळजबरीने मोटर सायकलवरुन उतरवून खाली ओढ्याजवळ नेण्यात आली. त्यावेळी तिघांनी आहेर यांची अंग झडती घेऊन खिशातील मोबार्इल, रोख रु पाच हजारांसह मोटर सायकल घेवून धूम ठोकली.

आहेर यांच्या अंगातील जर्कीन व कानटोपीही चोरटे घेऊन गेले. या प्रकरणी कोपरगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात रस्तालुटीची अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद नोंदवली असून पोलीस तपास चालू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या