आरोग्य, पर्यावरणातील हिंदुस्थानची वाटचाल  वाखाणण्याजोगी – बिल गेट्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे सध्या आरोग्य, पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत सुरू असलेले काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांची सुरू असलेली ही सकारात्मक वाटचाल अशीच सुरू राहील, ते जगाला आपल्या नवकल्पना देत राहतील, असे गौरवोद्गार अमेरिकन व्यावसायिक बिल गेट्स यांनी काढले आहेत. बिल गेट्स यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आरोग्य, पर्यावरण, हवामान बदल आणि जी-20 परिषदेबाबत चर्चा केली. हिंदुस्थानची कल्पकता आणि वेगळे काही तरी करण्याची धडपड जगासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.