पाच मराठी नेत्यांवर आले होते बायोपिक

2351

बायोपिक हे गेल्या काही वर्षात लोकप्रिय झालेली संकल्पना आहे. नट, खेळाडू आणि उद्योजकांवर बायोपिक आले होते आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांवरही बायोपिक आले होते, त्यातले काही चित्रपट लोकांनी अक्षरशः उचलून धरले होते.

ठाकरे – बाळासाहेब ठाकरे

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाची निर्मिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. बाळासाहेबांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी याने छान वठवली होती.

दुसरी गोष्ट – सुशीलकुमार शिंदे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आयुष्यावर आधारित दुसरी गोष्ट हा चित्रपट आला होता. त्यात शिंदे यांची भूमिका सिद्धार्थ चांदेकर आणि मोहन गोखले यांनी केली होती. तर शरद पवारांची भूमिका आनंद इंगळे यांनी केली होती.

महानायक वसंत तू – वसंतराव नाईक

राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांच्या आयुष्यावर आधारित महानायक वसंत तू हा चित्रपट 2015 साली आला होता. सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर याने वसंतरावांची भूमिका बजावली होती.

 यशंतराव चव्हाण बखर एका वादळाची

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित यशंतराव चव्हाण बखर एका वादळाची हा सिनेमा 2014 साली प्रदर्शित झाला होता. जब्बार पटेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

संघर्षयात्रा – गोपीनाथ मुंडे

स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारित संघर्षयात्रा हा चित्रपट 2017 साली प्रदर्शित झाला होता. गोपीनाथ मुंडे यांची भूमिका शरद केळकर या अभिनेत्यानी वठवली होती.

आपली प्रतिक्रिया द्या