
कल्याण येथील नामांकित बिर्ला कॉलेजमधील ६० ते ७० विद्यार्थ्यांची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, कल्याण येथील बिर्ला कॉलेजमध्ये सुमारे ६० ते ७० विद्यार्थ्यांची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर बँक खाती उघडली आणि त्या खात्यांमधून लाखो रुपयांची बेकायदेशीर उलाढाल करण्यात आली आहे.”
ते म्हणाले की, “या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. ह्यामध्ये विद्यार्थ्यांची काही चूक नसेल तर त्यांना भयमुक्त करावे.”

























































