केवळ जन्म प्रमाणपत्रावर होणार अनेक कामे, आजपासून देशभरात नवीन नियम लागू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजपासून जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व वाढणार आहे. 1 ऑक्टोबरपासून देशभरात नवीन नियम लागू होणार असून या नियमांतर्गत फक्त जन्म प्रमाणपत्र (बर्थ सर्टिफिकेट) द्वारे शाळेत प्रवेश घेणे, ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे, मतदार ओळखपत्र बनवणे, विवाह नोंदणी करणे, सरकारी रोजगार नोंदणी, पासपोर्ट आणि आधारकार्ड बनवणे यांसारख्या विविध कामांसाठी एकमेव जन्म प्रमाणपत्र लागणार आहे.

गीूपजन्म आणि मृत्यू नोंदणी (संशोधन) बिल 2023 हे नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. तसेच याला राष्ट्रपतींकडूनही मंजुरी मिळाली आहे. या नवीन कायद्याला 1 ऑक्टोबरपासून देशभरात लागू करण्यात येणार आहे. नवीन कायदा नोंदणी जन्म-मृत्यूचे राष्ट्रीय आणि राज्यनिहाय स्तरांवर डेटा बनवण्यास मदत मिळू शकणार आहे. हा नवीन नियम 1 ऑक्टोबरनंतर बनवल्या जाणाऱ्या जन्म प्रमाणपत्रावर लागू होणार आहे.