भाजपला मिळाल्या 750 कोटींच्या देणग्या, काँग्रेसपेक्षा पाचपट अधिक रक्कम

bjp-logo

गेल्या सात वर्षांपासून सर्वाधिक देणग्या मिळवणारा पक्ष भाजप ठरला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात भाजपला 750 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्षापेक्षा ही रक्कम पाचपट अधिक आहे.

राजकीय पक्षांना कंपन्या, संस्था, संघटना तसेच जनतेकडूनही आर्थिक स्वरूपात देणग्या देण्यात येतात. राष्ट्रीय पक्षांना 2019-20मध्ये मिळालेल्या देणग्यांची माहिती उघड झाली असून सलग सातव्या वर्षी भाजपला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे.

इलेक्टोरल ट्रस्ट

 • इलेक्टोरोल ट्रस्ट ही सेक्शन 25 खालील कंपनी आहे. ज्यामध्ये स्वच्छेने जमा केल्या जाणाऱया देणग्या एकत्र केल्या जातात आणि त्या राजकीय पक्षांना वितरित केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने कॉर्पोरेट हाऊसेसचा समावेश यामध्ये राजकीय पक्षांना देणग्या देणाऱयांची नावे गुप्त ठेवली जातात.
 • प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टमध्ये भारती एंटरप्रायझेस, जीएमआर एअरपोर्ट डेव्हलपर्स आणि डीएलएफ लिमिटेड हे मोठे देणगीदार आहे.

कोणत्या पक्षाला किती देणग्या

 • भाजप -750 कोटी
 • काँग्रेस -139 कोटी
 • राष्ट्रवादी काँग्रेस -59 कोटी
 • तृणमुल काँग्रेस – 8 कोटी
 • माकप – 19.6 कोटी
 • भाकप – 1.9 कोटी

14 शिक्षणसंस्थाही भाजपच्या देणगीदार

भाजपला देणग्या देणाऱयांमध्ये 14 शिक्षण संस्थांचाही समावेश आहे. यामध्ये दिल्लीतील मेवाड युनिव्हर्सिटीकडून 2 कोटी, कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग 10 लाख, रोहतक पठानिया पब्लिक स्कूल 2.5 लाख, कोटाच्या अॅलन करीअरकडून 25 लाख देणगी देणाऱयांमध्ये समावेश आहे. याचबरोबर मणीपाल ग्लोबल एज्युकेशनचे चेअरमन टी. व्ही. मोहनदास पै यांनी 15 लाखांची देणगी भाजपला दिली आहे.

भाजपचे प्रमुख देणगीदार

 • प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्ट -217.75 कोटी
 • जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट – 45.95 कोटी
 • बी.जी.शिर्पे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी – 35 कोटी
 •  लोढा डेव्हलपर्स -21 कोटी
 • आयटीसी ग्रुप – 16 कोटी
 • भाजप खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या ज्युपिटर कॅपिटल – 15 कोटी
 • सुधाकर शेट्टी यांच्या गुलमर्ग रिएलटर्स – 20 कोटी. जानेवारी 2020मध्ये ईडीने सुधाकर शेट्टी यांचे कार्यालये आणि घरांवर छापे टाकले होते.
आपली प्रतिक्रिया द्या