
सामना ऑनलाईन । पाटणा
सध्या लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप हे कुटुंबापासून वेगळे राहत आहेत. छोटा भाऊ तेजस्वीसोबत जागा वाटपावरून देखील त्यांचे मतभेद होत असल्याचे समोर आले आहे. मात्र तेज प्रताप यांना भाजप व जदयूवाले भडकवत असल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी केला आहे.
“लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात फूट पाडण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. काही लोकं माझ्या मुलाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित ते भाजप जदयूवाले देखील असू शकतात’, असा आरोप राबडी देवींनी केला आहे. दरम्यान राबडी देवी यांनी तेज प्रताप यादवला घरी परतण्याचे आवाहन देखील केले आहे.























































