
महाविकास आघाडीतील आमदारांची फोडाफोड करून सरकार पाडण्यात भाजपचा हात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केले आहे. मविआ सरकारमध्ये राज्यमंत्री असणारे आमदार बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले होते, असा दावा फडणवीस यांनी आज भर पत्रकार परिषदेत करत ‘ईडी’ सरकारच्या स्थापनेचे गुपित उघड केले.
भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 खोके घेतले, असा आरोप केला होता. यावरून राणा व कडू यांच्या निर्माण झालेला वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे काहिसा मिटला आहे. मात्र राणा यांनी कडू यांच्यावर केलेले आरोप खोडून काढताना मविआ सरकार पाडण्यासाठी आमदारांची फोडाफोड करण्यात भाजपचा हात असल्याची कबुली फडणवीस यांनी दिली आहे.
बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलकर गुवाहाटीला गेले होते. त्यांना मी स्वतः फोन केला होता. मी त्यांना सांगितले, आपल्याला सरकार बनवायचे आहे, तुम्ही सोबत हवे आहात. आमची इच्छा आहे की, तुम्ही आमच्या गटात यावे. माझ्या त्या एका फोन कॉलकरून बच्चू कडू हे गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात जाण्यासाठी कोणाशी सौदा केला, हे म्हणणंच चुकीचं आहे. बाकी इतरांबद्दल मला ठाऊक नाही, पण याचा अर्थ त्यांनी पैसे घेतलेत, असा होत नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळे जण गुवाहटीला गेले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माझ्या एका फोन कॉलवर बच्चू कडू हे गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात जाण्यासाठी कोणाशी सौदा केला, हे म्हणणंच चुकीचं आहे. बाकी इतरांबद्दल मला ठाऊक नाही.
































































