निलंग्यातून मोठ्या मताधिक्याने संभाजी पाटील निलंगेकर यांचा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदारसंघ भाजपने राखण्यात यश मिळवले आहे. काका अशोक पाटील निलंगेकर याचा पराभव करुन पुतणे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर विजयी झाले आहे. तब्बल 32 हजार 131 मते मिळवून त्यांनी विजय संपादन केला आहे. 

निलंगा विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. काका-पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता होती. भाजपचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तब्बल 49.32 टक्के मते मिळवली. 97 हजार 324 मते मिळवून त्यांनी विजय संपादन केला. 32 हजार 131 एवढे मताधिक्य त्यांनी मिळवले. काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील निलंगेकर यांनी 33.04 टक्के मते मिळवली. त्यांना 65193 मतांवर समाधान मानावे लागले. या मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडीचे अरविंद भातांब्रे यांनी 29819 एवढी मते घेतली. 15.11 टक्के मते मिळवण्यात वंचितला यश मिळाले आहे. 0.64 टक्के म्हणजे 1272 मते नोटाला मिळाली.